आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर- दोन बसची समोरासमोर धडक, 23 प्रवाशी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
नागपूर- नागपूर जिल्ह्याच्या कोंढाळी गावात 2 बसमध्‍ये भीषण अपघात झाला आहे. दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात 23 प्रवाशी जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्‍या सुमारास हा अपघात झाला.
- कोंढाळी-काटोल आणि काटोल- कोंढाळी या दोन बसमध्‍ये हा अपघात झाला आहे.
- नागपूरहून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्रीघाटात या दोन बसमध्‍ये ही धडक झाली.
- समोरून येणारी बस दुस-या चालकाला दिसली नसल्‍याने हा अपघात झाल्‍याचा अंदाज आहे.
- अपघातात 23 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
- जखमींना उपचारासाठी नागपुरात हलवण्‍यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...