आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय सुचवू, पण पुढाकार नाही, प्रादेशिक ‘भूजल सर्वेक्षण’चा वॉटर हार्वेस्टिंगकडे कानाडोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत मराठवाड्यातील आठ जिल्हे व 76 तालुक्यांतील भूजल पातळीचे सर्वेक्षण करून खालावलेली जलपातळी उंचावण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांना उपाययोजना सुचवण्यात येते. मात्र, स्वत:च्या कार्यालयावरच रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा या विभागाला विसर पडला आहे.
त्यामुळे दरवर्षी साडेतीन लाख लिटर पाणी या कार्यालयाच्या छतावरून वाया जात आहे.
अदालत रोडवर मराठवाडा विकास महामंडळाच्या मालकीची 25 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली इमारत आहे. येथे विकास आयुक्त (हस्तशिल्प), मानव विकास आयुक्त, मराठवाडा विकास महामंडळ, सहसंचालक उद्योग, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, उपसंचालक रोजगार व स्वयंरोजगार विभाग, भारतीय मानक ब्युरो व प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कार्यालय आहे. या सर्व कार्यालयांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास किमान दोन लाख 75 हजार लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.
25 हजार चौरस फूट इमारतीचे एकूण क्षेत्रफळ
05 हजार चौरस फूट छताचा आकार
03 लाख 50 हजार लिटर छतावर पडणारे पावसाचे पाणी
02लाख 75 हजार लिटर पाणी मुरवता येऊ शकते.