आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackarey News In Marathi, MNS Chief, Divya Marathi

राज ठाकरे मराठवाड्यातील इच्छुकांच्या आज घेणार मुलाखती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी दुपारी शहरात दाखल झाले. सोमवारी जालना रोडवरील सागर लॉन येथे सकाळी साडेनऊ वाजेपासून मराठवाड्यातील इच्छुकांच्या ते मुलाखती घेणार आहेत. या भागातील ४६ जागांसाठी तब्बल २०० जण उत्सुक आहेत.

सहा महिन्यांनंतर राज ठाकरे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली हाेती. रविवारी विमानतळावरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे कुणाकुणालाला उमेदवारी देतील, याकडे लक्ष आहे. या अगोदर बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांनी इच्छुकांशी चर्चा केली होती. शिवाय अहवालही मागवले होते. आता साेमवारी राज यांच्यासमवेत आमदार मंगेश सांगळे, बाळा नांदगावकर, सचिव अविनाश अभ्यंकर हे मुलाखती घेतील.

अफवांमुळे अस्वस्थता
राज ठाकरेंच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील शिवसेनेतील काही बडे नेते मनसेच्या संपर्कात असल्याची दिवसभर चर्चा हाेती. त्यामुळे शिवसैनिकांसह मनसेतील इच्छुक उमेदवारांमध्येही अस्वस्थता आहे.

आघाडीची छुपी मदत ?
मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मोदी लाटेचा फायदा या निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवारांना होईल, अशी आघाडीच्या नेत्यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या मतांचे िवभाजन करण्यासाठी मनसेला मराठवाड्यात दोन्ही काँग्रेसकडून पाठबळ दिले जात असल्याची चर्चा आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेने यापूर्वीच आघाडीशी हातमिळवणी करत तीन सभापितपद िमळवले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती िजल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत हाेण्याची शक्यता आहे. नुकतेच नाशिक महापालिकेतही मनसेने दाेन्ही काँग्रेसची मदत घेत महापाैरपद आपल्याकडे कायम राखले आहे.

अिस्तत्व िटकविण्‍याचे आव्हान
मागील िनवडणुकीत राज्यात मनसेचे १३ हाेते. कन्नडमधील िवजयाने हर्षवर्धन जाधव यांनी मराठवाड्यात पक्षाचे खाते उघडून दिले हाेते. मात्र आता हेच जाधव शिवसेनेत गेल्याने मराठवाड्यात पुन्हा एक तरी जागा िनवडून आणण्याचे मनसेसमाेर आव्हान असेल.