आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : हे आहेत बालपणीचे राज ठाकरे, राजकारणाचे मिळाले बाळकडू, पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
मुंबई - महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मंगळवारी आपले फेसबुक पेज, वेबसाइट आणि टि्वटर हँडलवरून पक्षाचे राज ठाकरे, त्‍यांचे बंधू जयदेव ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो अपलोड करून आदित्‍य यांना टॅग केलेत. त्‍यामुळे या मागे मनसेचे कोणते 'राज'कारण आहे, या बाबत चर्चेला ऊत आला होता. दरम्‍यान, आज (बुधवारी) मसनेचे कार्यकर्ते प्रथमेश कुलकर्णी यांनी त्‍यांच्‍या फेसबुक वॉलवर ठाकरे कुटुंबियांचे अनेक दुर्मिळ छायाचित्र पोस्‍ट केलेत. त्‍यातील राज ठाकरे यांच्‍या जडघडणीची मालिकाच समोर उभी राहते. त्‍यांच्‍या जीवनाबद्दल divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी ही खास माहिती...
राज कसे आले राजकारणात ?
14 जून 1968 रोजी राज यांचा जन्‍म झाला. त्‍यांना काका बाळासाहेब यांच्‍याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाली. विद्यार्थी सेनेच्‍या माध्‍यमातून ते सक्रिय राजकारणात आलेत. पुढे उद्धव ठाकरे यांच्‍यासोबत झालेल्‍या राजकीय मतभेदातून त्‍यांनी मनसेची स्‍थापना केली.
उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका
मनसेच्‍या स्‍थापनेनंतर काहीच दिवसांत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधले. मुंबई अगोदरच बकाल झाली असून, हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी आणि बिहारी लोकांवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही, आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात, अशी टीका त्‍यांनी केली. त्‍यातून ते देशभर प्रकाशझोत आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा राज यांचे बालपणीचे दुर्मिळ फोटोज...