आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray In Aurangabad For Maharashtra Election 2014 Candidate Interview

प्रकृती बिघडल्याने राज ठाकरे मुंबईकडे रवाना, इच्छूकांच्या मुलाखती अर्धवट सोडल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इच्छूकांच्या मुलाखती थांबवण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास राज यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते रामा हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळाने ते मुंबईकडे रवाना झाले. आजच्या उर्वरित आणि उद्याच्या मुलाखती होतील की नाही, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, मराठवाड्यातील विधानसभेच्या 46 जागांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे इच्छूकांच्या मुलाखती घेत होते. येथील जालना रोडवरील सागर लॉन येथे सकाळी 9 वाजतापासून मुलाखतींना सुरवात झाली होती. एका जागेसाठी 15 ते 20 जण इच्छूक असल्याचे पाहायला मिळाले. इच्छूकांच्या झालेल्या गर्दीने मनसेकडे उमेदवारच नाही, या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर मिळाले असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.

पक्षाध्यक्ष राज ठाकरे मुलाखती घेण्यासाठी रविवारी दुपारीच शहरात दाखल झाले. गेल्या सहा महिन्यातील त्यांचा हा पहिला मराठवाडा दौर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत. येथील एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छूक असल्याचे चित्र येथे पाहाण्यास मिळाले. विरोधकांनी मनसेची खिल्ली उडविताना त्यांच्याकडे उमेदवारच नसल्याची टीका केली होती. त्याला आजच्या मुलाखतींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. विशेष म्हणजे या मुलाखतींसाठी शिवसेना - भाजपचे माजी आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिवसेनेचे पाथरी येथील माजी आमदार हरीभाऊ लहाने मनसेच्या तिकीटासाठी इच्छूक आहेत. त्याच बरोबर नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघासाठी रोहिदास पाटील, बीडमधून प्रा. सुनील धांडे मुलाखतीसाठी उपस्थित आहेत.

लोकसभा निवडणूकीत मनसेचे खाते देखील उघडले नाही, अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले होते. यामुळे विधानसभेत त्यांच्याकडे उमेदवारही नाही अशी टीका त्यांच्या विरोधकांनी बर्‍याच दिवसांपासून सुरु केली होती. यामुळे मनसैनिकांमध्येही अस्वस्थता होती. मात्र, राज ठाकरे मुलाखती घेण्यासाठी स्वतः आल्याने मराठवाड्यातील कार्यकर्ते आनंदीत झाले आहेत. राज ठाकरेंसोबत त्यांचे चिरंजीव अमित देखील आहेत.

आज मराठवाड्यातील तीनच जिल्ह्यांच्या मुलाखती असताना संपूर्ण मराठवाड्यातून इच्छूक आपल्या कार्यकर्त्यांसह आले आहेत. यामुळे दुपारी जालना रोडवर वाहतूकीचा खोळंबा झाला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मराठवाड्यातील मनसे इच्छूक