आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Meeting With Party Activist In Mumbai

ओळख दिली आता कामाला लागा : ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पक्षाने तुम्हाला ओळख दिली, पदे दिली आता काम करायला लागा, येणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांना धारेवर धरा. कामात दिरंगाई नको, जे काही बदल झाले आहेत ते माझ्या मर्जीने झाले आहेत. अन्याय झाल्यावर धावत पळत येतात, मात्र न्याय केल्यावर कोणी येत नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मनसेच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांना फटकारले. दादर येथे सोमवारी (2 सप्टेंबर) पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

औरंगाबाद जिल्हा आणि शहरातील सुमारे 25 पदाधिकारी या बैठकीसाठी हजर होते. यात जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, बाबासाहेब डांगे, डॉ. सुनील शिंदे, सुमीत खांबेकर, ज्ञानेश्वर डांगे, राज वानखेडे यांचा समावेश होता. काम करणार्‍या कार्यकर्त्यांवर पक्षाकडून कधीही अन्याय होणार नाही याची खात्री बाळगा, चूक करणार्‍यांना त्यांची शिक्षा नक्की मिळेल, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. नवीन नियुक्त्या या माझ्या मर्जीने झाल्या असून गटातटाचे राजकारण चालणार नसल्याची ताकीदही त्यांनी दिली. निवडणुकासाठी बूथनिहाय पक्ष बांधणी करा. यासाठी 1 हजार मतदारांमागे एका गटनायकाची नेमणूक करण्याचे आदेशही या वेळी त्यांनी पदाधिकार्‍यांना दिले.