आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Marathwada Sleet,

सेनेच्या बालेकिल्ल्याला प्राधान्य, गारपीटग्रस्तांसाठी राज ठाकरेंचा दौरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गारपीटग्रस्त भागांना भेट देण्याच्या नावाखाली शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या मतदारसंघांतील नुकसानीचा आढावा घेतला. त्यापाठोपाठ आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांची पाहणीसाठी निवड केल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत राज ठाकरे पाहणी करणार आहेत.

अस्मानी संकटाने झोडपून काढले आहे. बहुतांश पिके झोपल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी मराठवाडा दौर्‍याला प्रारंभ केला. शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या औरंगाबादपासूनच त्यांनी दौर्‍याला प्रारंभ केला आहे. मंगळवारी त्यांनी राजकीय भाष्य केले नसले तरी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या गडांना हादरा देण्याचाच हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. या दौर्‍याच्या निमित्ताने संघटन कामाला लावून निवडणुकीत शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. नाशिकमध्येही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात मनसेचे प्राबल्य असल्याने नाशिकपेक्षा औरंगाबादच्या पाहणीला राज ठाकरे यांनी महत्त्व दिले आहे. औरंगाबादेत सध्या शिवसेनेच्या विरोधात वातावरण असल्याने त्याचा फायदा घेण्याचे हे राजकारण असल्याचे सांगितले जाते.

फरक पडत नाही : दानवे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, गारपीटग्रस्तांना दिलासा देणे ही आजची प्राथमिक गरज आहे. त्यात कुणीही राजकारण आणू नये अशी शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. राज ठाकरे यांना काही साधायचे असेल तरी त्याने शिवसेनेवर फरक पडेल असे बिलकूल वाटत नाही.