आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनिर्माणासाठी राज ठाकरे यांचा चारदिवस नाशिक मुक्काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे पंधरवड्यात दुसऱ्यांदा नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १२) दुपारी दाखल हाेत असून, चारदिवसांच्या अापल्या मुक्कामात ते व्यापारी सामाजिक संघटना यांच्याशी चर्चा करून नाशिकच्या नवनिर्माणासाठी महापालिकेमार्फत काय करता येईल याचा अाढावा घेणार अाहेत.

पंधरवड्यापूर्वी राज यांनी नाशिकचा दाैरा करीत यापुढे वारंवार माझा दाैरा असेल, असे जाहीर केले हाेते. पालिकानिवडणुकीत नाशिकच्या नवनिर्माणाबाबतदिलेला शब्द

पूर्ण करण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष घातले असून, गेल्या अाठवड्यात संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी फेरबदलाचे संकेतदिले हाेते. अाता शहराच्या दृष्टीने

व्यापारी, सामाजिक संघटना अन्य महत्त्वाच्या घटकांची भूमिका काय हे ते जाणून घेतील. त्यांचा साेमवारपर्यंत नाशिकला मुक्काम असेल, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. या

दरम्यान राज हे वैयक्तिकरीत्या प्रत्येकाशी चर्चा करतील, असे सांगितले जाते. याबराेबरच तारांगण, पुष्प उद्यान, शिवाजी उद्यान, बाॅटनिकल गार्डन, फाळके स्मारक, पेलिकन

पार्क अशा प्रकल्पांचा ते अाढावा घेतील. मागील दाैऱ्यातदिलेल्या संकेतांप्रमाणे ते संघटनात्मक फेरबदलाबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले अाहे.