आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Organized Rally Issue At Mumbai, Divya Marathi

निराश कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी राज यांची मुंबईत होणार सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत अपयश पदरी पडल्यामुळे निराश झालेल्या मनसे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ते जोमाने कामाला लागावेत या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 31 मे रोजी मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा घेणार आहेत.
सभेला गर्दी जमवण्यासाठी शहर पदाधिकार्‍यांना टार्गेट दिले असून शहरातून 10 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सभेसाठी जातील, अशी माहिती पदाधिकार्‍यांनी दिली.

मनसेने लोकसभेसाठी उभ्या केलेल्या दहापैकी एकाही उमेदवाराला डिपॉझिट वाचवता आले नाही. नाशिक, मुंबई गड मानणार्‍या मनसेला या ठिकाणीही मतदारांनी नापसंती दर्शवली. हे अपयश नेमके का आले याचे चिंतन मनसे नेत्यांमध्ये सुरू आहे. येणार्‍या विधानसभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येणार्‍या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची खेळीदेखील या सभेनंतर स्पष्ट होऊ शकते. सध्या या सभेला अधिकाधिक पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि गटाध्यक्ष यावेत हा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संपर्क अध्यक्ष गजानन काळे 29 मे रोजी औरंगाबादेत कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

शहर कार्यकारिणीचा पुनर्विचार शक्य
नाशिक लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नाही. म्हणून शहराध्यक्ष समीर शेटे यांनी राजीनामा दिला. औरंगाबादेत निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन कार्यकारिणीचा पुनर्विचार होऊ शकतो, अशी माहिती नेत्याने दिली.