आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Tell Me Not Speak Anyone, Thackeray\'s Sun Amit Said

साहेबांनी सांगितले, कोणाशीच बोलू नको, \'राज\' पुत्र अमितचे बोल; कार्यकर्त्यांचा हिरमोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: राज ठाकरे आणि यांचे चिरंजीव अमित)
औरंगाबाद - ‘साहेबांनी सांगितलंय, कोणाशीच बोलू नको!’ असे सांगत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी गुरूवारी औरंगाबादेत मौन बाळगले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खास ‘ठाकरी शैली’च्या वक्तृत्वाचा वारसा चालवून भल्याभल्यांच्या फिरक्या घेणा-या राज यांचे चिरंजीव कसे बोलतात हे ऐकण्यास उत्सूक असलेल्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त अमित गुरुवारीऔरंगाबादेत आले होते. आपल्या खास वक्तृत्व शैलीच्या बळावर राज सभांना गर्दी खेचतात आणि सभेत भल्या भल्यांचा खरपूस समाचारही घेतात, हे माहीत असलेल्या कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींची अमित यांनाही राज यांच्याकडून वक्तृत्वाचे ‘बाळकडू’ मिळाले असावेत, अशी धारणा होती. परंतु अमित काहीच बोलले नाहीत. याबाबत त्यांना विचारले असता, ते शांतपणे म्हणाले, ‘साहेबांनी (राज ठाकरे)आदेश दिले आहेत की कोणाशीही बोलू नको!' त्यामुळे कार्यकर्त्यांना फोटो सेशनवरच समाधान मानावे लागले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित यांचे सिडको, मयूर पार्क, नारळीबाग व छावणीत कार्यक्रम होते. मात्र, एकाही कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्ते किंवा पदाधिका-यांशी संवाद साधला नाही.

पुढे वाचा, मौनामागचे ‘राज’ काय?