आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Visit Rain hit Areas Of Aurangabad Latur

गारपीटग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदतीची गरज - राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद / लातूर - मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यांना अस्मानी संकटाने झोडपून काढले आहे. लाखो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना त्वरीत दिलासा देणे गरजेचे आहे. त्यांचे पिक कर्ज आणि वीज बील माफी देऊन सरकारने त्यांना धिर दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच त्यांनी शेतकर्‍यांनी आत्महत्येसाऱखे पाऊल उचलू नये, असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी बुधवारी मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागांना भेट दिली आणि शेतकर्‍यांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर आणि इतर आमदार होते.
राज ठाकरे म्हणाले, 'उत्तराखंडमध्ये ज्या प्रमाणे निसर्गाने थैमान घातले होते, तिच परिस्थिती येथे निर्माण झाली. पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत देणे हे सरकारी धोरण झाले. मात्र, ही परिस्थिती पाहाता ते थोडे बाजूला ठेवून शेतकर्‍यांना तत्काळ दिलासा देणे गरजेचे आहे.'
शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन प्रश्न सुटणार नाही, त्यांनी धीर धरुन काम करावे, असे सांगत ते म्हणाले, लाखो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍याचा धिर खचला आहे. मात्र, त्यांनी खचून न जाता हिंमतेने या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारने देखील शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

छायाचित्र - पैठण येथे पावसामुळे भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा...