आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयात केवळ सेटिंग, त्वेषाने प्रश्न विचारणा-या आमदारांवर राज ठाकरे यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभेत आमदार अगदी त्वेषाने प्रश्न मांडतात, प्रश्न मांडल्यानंतर त्यांना मंत्री आपल्या दालनात बोलावून घेतात आणि चार भिंतींच्या आत सेटलमेंट होते, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. जिल्ह्यातील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते.
हातात सत्ता दिली, तर मी केवळ पर्यटनावरच महाराष्ट्रात 15 लाख तरुणांना रोजगार देईल. प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा अकादमी, सरकारी सुरक्षा एजन्सीत तरुणांना रोजगार, महिलेच्या नावावर घर केल्यास करातून माफी, अशा अनेक गोष्टी राज यांनी आपल्या ब्ल्यू प्रिंटच्या झोळीतून काढून मतदारांसमोर मांडल्या. पल्या खास ठाकरी शैलीत त्यांनी आर. आर. पाटील, अजित पवार यांचा समाचार घेतला. पर्यटनापासून रोजगारापर्यंत आणि शिक्षणापासून सुरक्षेपर्यंत अशा अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या. सातवी पास राजकारणी शिक्षण संस्था उघडतात आणि स्वत:ला शिक्षण सम्राट म्हणवून घेतात, असे म्हणत त्यांनी ब्ल्यू प्रिंटमधील अनेक मुद्दे श्रोत्यांसमोर मांडले. गंगापूर, वैजापूर, कन्नड, फुलंब्रीसहित शहरातील नागरिकांनी सभेसाठी गर्दी केली होती.
मनसेच्या गाण्यांवर तरुणांनी धरला ताल
मनसेच्या अधिकृत गाण्यांवर तरुणांनी सभेत ताल धरला. हे पाहण्यासाठी राज ठाकरे थांबले होते. या वेळी अविनाश अंभ्यकर, प्रमोद पाटील, अमित ठाकरे, उमेदवार राज वानखेडे, सुमीत खांबेकर, गौतम आमराव, दिलीप चितलांगे, बाबासाहेब डांगे यांची उपस्थिती होती. संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले.