आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज विकास करतील, मात्र उमेदवारांच्या कार्यक्षमतेवर तरुणांनी उभे केले प्रश्नचिन्ह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्राविषयीची तळमळ सर्वांना जाणवते. ते काहीतरी वेगळे करतील याची खात्रीदेखील वाटते. मात्र, त्यांच्या उमेदवारांकडे पाहिले की मनात शंका निर्माण होते, असे मत विविध क्षेत्रातील तरुणांनी मांडले.
राज यांच्या सध्या विविध ठिकाणी सभा होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तरुणांची मते जाणून घेतली असता त्यांनी राज यांच्यावर विश्वास दाखवला. सध्या महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटविषयी राज प्रत्येक सभेतून भरभरून बोलत आहेत. यातून वातावरण निर्मितीही होत आहे. आतापर्यंत आक्रमकपणे बोलणारे राज विकासाच्या मुद्द्यावर आत्मविश्वासाने बोलत असताना त्यांनी दिलेले उमेदवार स्वप्नातील महाराष्ट्र ख-या अर्थाने घडवू शकतील का? अशी शंका तरुण उपस्थित करत आहेत. राज यांच्या सभा म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठीची धडपड असल्याचे रितेश माळी म्हणतो, तर सभांना खूप गर्दी होते मग मतदानाच्या वेळी ही गर्दी जाते कुठे, असा सवाल पवन शिंदे याने उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या भाषणातून त्यांची महत्त्वाकांक्षा स्पष्ट दिसते, असे राहुल गायकवाड याने सांगितले. राज यांचे भाषण किती वेळाही ऐकावेसे वाटते, असे सुहानी जोशी म्हणाली, तर राज यांच्या भाषणात आत्मविश्वास वाटत असल्याचे प्रशांत क्षीरसागर म्हणाला.