आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळाव्याची तयारी अपूर्ण; राज ठाकरेंचा दौरा रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पक्षाची विस्कळीत घडी पुन्हा बसवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १७ ते १९ सप्टेंबर असा तीन दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला. मात्र, मेळाव्याची तयारी झाल्यामुळे हा दौरा रद्द करावा लागल्याची चर्चा आहे. याबाबत राज्य पदावरील शहरातील पदाधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मत प्रदर्शित केले नाही.
मराठवाड्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी रिक्त पदे भरणे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे नियोजन होते. यासाठी बीडसह शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही शहरात झाली. मेळाव्यासाठी संत तुकाराम नाट्यगृह निश्चित करण्यात आले. मात्र तयारी झाल्यामुळे मेळावा रद्द करून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले. मात्र, तयारी झाल्यामुळे ही बैठकही रद्द करण्यात आली. मराठवाड्यात पक्षाचे तीन राज्य उपाध्यक्ष आहेत. यातील दोघे शहरात आहेत. तरीही हा दौरा रद्द करण्यात आला.

नियुक्त्यांचे अधिकार स्थानिक नेत्यांना : आतापर्यंततालुकाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष अशा पदांवर मुंबईतून नेमणूक होत असे. या पुढे हे अधिकार स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. याचे नियोजन या बैठकीत होणार होते. मात्र, बैठक रद्द झाल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

सोशल मीडियाद्वारे निरोप
राज ठाकरे येणार असा निरोप फेसबुकवर टाकण्यासाठी पदाधिकाऱ्यांत चढाओढ होती. अनेकांनी फेसबुक अकाउंटवरून जाहीर करून टाकले होते. मात्र पक्षाकडून असे कुठलेही पत्र आले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...