आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे आज शहरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता विमानाने औरंगाबाद शहरात येत आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत ते रामा इंटरनॅशनल येथे थांबणार असून त्यानंतर ते माजलगावकडे रवाना होतील. तेथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासंदर्भात ते हजर राहणार आहेत. सोमवारचा मुक्काम बीड येथे असून मंगळवारी 10 जुलै रोजी अंबाजोगाई न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यानंतर लगेच औरंगाबादकडे रवाना होणार असून संध्याकाळी पाचच्या विमानाने ते मुंबईला प्रयाण करतील.