आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajani Patil News In Marathi, CM And State President

महिलेमुळेच तुम्ही खुर्चीवर आहात; रजनी पाटील यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आशीर्वादानेच तुम्हाला पदे मिळाली आहेत, अशा शब्दात खासदार रजनी पाटील यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना सुनावले. पाटील यांच्यासह महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे या दोन महिला व्यासपीठावर पहिल्या रांगेत होत्या. सर्वांची भाषणे संपली. प्रदेशाध्यक्ष-मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मेळावा संपणार होता. मात्र, महिलांना बोलण्यास संधी का नाही, असा सवाल असलेली चिठ्ठी व्यवहारे यांनी दिली. पाटील यांनी अशोक चव्हाणांकडे मुद्दा उपस्थित केल्यानंतर ‘अरे यांनाही बोलू द्या’ अशी सूचना ठाकरे यांनी केली. त्यानंतर पाटील बोलण्यास उठल्या आणि सुनावून मोकळ्या झाल्या.

माणिकरावांनी ठणकावले: राष्‍ट्रवादीला एकही जागा वाढवून देणार नाही!
विधानसभेसाठी एकही जागा वाढवून देणार नाही म्हणजे नाहीच, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेसने शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला ठणकावले. स्वबळाची भाषा करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी स्वत:चे बळ जाणून घ्यावे. बारामतीत काँग्रेसने मदत केली नसती तर सुप्रिया सुळे यांची काय अवस्था झाली असती हेही तपासून बघावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपल्या सहकारी पक्षाला दिला. लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्याने राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र होते. मात्र आता थेट शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचाच उल्लेख करत हल्ला केल्याने काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पहिल्यांदाच दिसले.
मराठवाडा विभागीय संकल्प मेळाव्यात बोलताना माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
धाकट्या पवारांचा तोरा
राष्ट्रवादी राज्यात नंबर वन, जागावाटप सन्मानाने व्हावे

‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. हा राज्यात नंबर वन पक्ष ठरला आहे. विधानसभेचे जागावाटप सन्मानपूर्वक व्हावे. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान व पक्षाच्या धोरणाला मुरड घालणार नाही.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री (यवतमाळमध्ये)

थोरल्या पवारांची सबुरी
राज्यातील नेत्यांचे सोडा, दिल्लीकडे बघा, धीर धरा

काँग्रेस पक्षश्रेष्ठी आघाडीचे सन्मानाने जागावाटप करतील. त्यात राष्ट्रवादीवर अन्याय होणार नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांची काय भूमिका आहे, यापेक्षा दिल्लीत काँग्रेस काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे आहे. यामुळे आघाडीत बिघाडी होईल अशी वक्तव्ये तुम्ही करू नका. धीर धरा.
- शरद पवार, (मुंबईतील पक्षाच्या बैठकीत)