आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajasthan Railway Scam News In Marathi, Aurangabad Inspector, Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानातील रेल्वे भरती घोटाळा औरंगाबादच्या इन्स्पेक्टरवर संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राजस्थानातील रेल्वे भरती घोटाळ्यात औरंगाबादचा पोलिस निरीक्षक सहभागी असल्याचा संशय आहे. त्याच्या शोधार्थ कोटा येथील पोलिसांचे पथक येथे येऊन गेले. मात्र, आधीच कुणकुण लागल्याने तो हाती लागू शकला नाही, अशी माहिती कोटा येथील कोतवाली पोलिस ठाण्याचे इन्चार्ज हरिचरण मीना यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

बनावट नियुक्तीपत्रे देऊन युवकांना गंडविणार्‍या टोळीला 26 जानेवारी रोजी अटक केली. त्यात कन्नड येथील भूषण देशमुखचा समावेश होता. त्याच्याकडून काही कागदपत्रे जप्त केली. चौकशीत त्याने बेरोजगार तरुणांकडून 2 कोटी 18 लाख रुपये उकळल्याची कबुली दिली. काही उमेदवार औरंगाबाद वायरलेस विभागातील पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनीच माझ्यापर्यंत पोहोचवले, असे त्यांनी सांगितले. त्या आधारे जाधवच्या शोधासाठी कोटा पोलिस ठाण्याचे पथक 12, 13 फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत येऊन गेले. सातारा येथे जाधव यांच्या घरीही विचारपूस केली. दरम्यान, पथक औरंगाबादेत असतानाच अक्षय जाधव याने भूषणविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. परंतु त्यात दिलीप जाधव यांचा उल्लेख नाही.