आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Darda Contest Aurangabad Lok Sabha Seat, Congress Report

राजेंद्र दर्डांनी औरंगाबाद लोकसभा लढवावी,कॉंग्रेसचा अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा अहवाल काँग्रेसच्या प्रदेश पदाधिका-यांनी राज्य समितीकडे पाठवला आहे. दर्डा यांनी मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट करून पक्षादेश असेल तर मैदानात उतरू, असे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
1996मध्ये रामकृष्णबाबा पाटील यांचा अपवाद वगळता गेल्या 25 वर्षात औरंगाबाद जिल्ह्यावर शिवसेनेची पकड कायम राहिली. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत चंद्रकात खैरे निवडून आले. निकालानंतर झालेल्या पक्षांतर्गत बैठकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार मजबूत नसल्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले, असा सूर लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ताब्यातून मतदारसंघ हिसकावून घेण्याची क्षमता असलेला नवीन उमेदवार यंदा द्यावा, असा प्रयत्न प्रदेश कार्यकारिणीकडून होत आहे. राहूल गांधी यांच्या निर्देशानुसार पदाधिका-यांच्या मतदानातूनच उमेदवाराची निवड होणार असली तरी खैरेंना तुल्यबळ कोण ठरू शकतो, याविषयी चाचपणी करण्यात आली. त्यानुसार प्रदेश कार्यकारिणीवर असलेल्या पदाधिका-यांनी एक अहवाल पाठवला आहे. त्यात दर्डा हेच खैरेंना टक्कर देऊ शकतात आणि विजयी होऊ शकतात असे स्पष्ट करून शालेय शिक्षणमंत्रिपदामुळे दर्डांचा जनसंपर्क वाढला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन वेळा लोकसभेच्या निवडणुकीत नेमके काय झाले, याचीही टिप्पणी अहवालासोबत आहे.
अहवालात नमूद दर्डांची शक्तिस्थळे अशी
०दर्डांच्या मालकीचे दैनिक असल्याने त्याचा प्रचारात प्रभावी वापर करू शकतात. ०गेल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्याचा अनुभव. ०आर्थिक दृष्टीने मजबूत. ०दलित, मुस्लिम तसेच राष्ट्रवादीशी चांगले संबंध. ०काँग्रेसच्या गटा-तटाच्या राजकारणाचा फारसा धोका नाही.
खैरेंशी मैत्री; पण...
माझी खैरेंशी मैत्री आहे. मात्र, त्याचा अर्थ त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार नाही, असा होत नाही. परंतु माझे मोठे बंधू आधीच राज्यसभेत खासदार आहेत. त्यामुळे माझी निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा नाही. तरीही पक्षादेश असेल तर रिंगणात उतरण्याची माझी तयारी आहे.’
राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री