औरंगाबाद- आज राजमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा घडवणा-या जिजाऊ मॉंसाहेबांचे स्वराज्यात मोठे योगदान आहे. शिवबा, अफझलखानाच्या भेटप्रसंगी तुम्ही कामी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करीन, असा हा निर्धार जागृत ठेवणा-या जिजामातेने शिवरायांना घडवले. राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त जाणून घेऊया काही खास बाबी..
- राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा येथे झाला.
- त्यांच्या आईचे नाव म्हाळसाराणी आणि वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव असे होते.
- जिजाऊंच्या प्राथमिक शिक्षणात युद्ध शिक्षण, राजनीती, भाषा, अनेक खेळ शिकविले गेले.
- मराठी, फार्सी, संस्कृत, कन्नड, तेलगू, उर्दू, हिंदी अनेक भाषा जिजाऊंना अवगत होत्या.
- त्यांचा विवाह 1610 मध्ये वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जिजाऊंबाबत या महत्त्वाच्या बाबी..