आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजनाथ सिंह औरंगाबाद व जालना या जिल्ह्यांची करणार दुष्काळी भागाची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड/औरंगाबाद - भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह 1 एप्रिलला औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहेत. बदनापूर, औरंगाबाद, फुलंब्री व सिल्लोड तालुक्यातील गावांना ते भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करतील. खासदार गोपीनाथ मुंडे, खासदार रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार या दौ-यात सोबत असतील. सिंह सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विशेष विमानाने औरंगाबादला येतील. राजे संभाजी साखर कारखान्याने उभारलेल्या गुरांच्या छावणीला भेट देऊन औरंगाबाद तालुक्यातील पिंप्री येथील जळालेल्या मोसंबीच्या बागांची पाहणी ते करतील. लाडसावंगी येथे भाजपच्या वतीने दुष्काळ परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भाकरवाडी (ता. बदनापूर) येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीस भेट व शेतक-यांसोबत सिंह जेवण घेणार आहेत.