आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raju Shetty News In Marathi, Madha Loksabha Election Seat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीतही धुसफूस स्वाभिमानी संघटनाच लढवणार माढा : शेट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘माढा मतदारसंघ मिळवण्यासाठी महायुतीचा घटक असणार्‍या राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाइंने दावा केला. परंतु तेथील शेतकर्‍यांनी सदाभाऊ खोत यांना आधीच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यात खोडा घालू नका,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी रासप व रिपाइं या मित्रपक्षांना केले. विरोध करण्याची रामदास आठवलेंची जुनीच सवय आहे, त्यामुळे ते माढय़ात आम्हाला विरोध करत असल्याचे शेट्टी म्हणाले.

शेट्टी ब्लॅकमेल करतात : राष्ट्रीय समाज पक्षाने मागील निवडणूक माढय़ातून लढवून बहुतांश जनाधार मिळवला. मतदारांचा कल पाहता, ही जागा ‘रासपला’चीच; परंतु शेट्टी महायुतीला ब्लॅकमेल करताहेत, असा आरोप रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला.