आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईसाठी लवकरच आणखी एक रेल्वे; राज्य राणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत धावणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबईसाठी आणखी एक नवी रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी सोमवारी (२० नोव्हेंबर) दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव सेंट्रल रेल्वे विभागाच्या महाव्यवस्थापकांसमोर प्रस्ताव ठेवणार आहेत. त्यांच्या निर्णयानंतर लगेच राज्य राणी एक्स्प्रेसचा नांदेड ते मुंबई सीएसटीपर्यंत लवकरच विस्तार होईल, तसेच मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईसाठी आणखी एक नवीन रेल्वे मिळेल, अशी माहिती रेल्वे विभागाचे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 


सध्या राज्य राणी एक्स्प्रेस मनमाड ते सीएसटीदरम्यान धावते. मनमाड स्थानकातून पहाटे ५.२५ निघते. मुंबई स्थानकातून सायंकाळी ६.५० वाजता परत सुटते. रात्री ११.२५ वाजता मनमाडला ती पोहोचते. त्यानंतर सहा तास आणि मुंबईत १० तास म्हणजे १६ तास रेल्वे यार्डात थांबते. त्याऐवजी या रेल्वेचा नांदेडपर्यंत विस्तार करावा, अशी अनेक महिन्यांची मागणी होती. त्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला आहे. २० नोव्हेंबर रोजी महाव्यवस्थापकांमध्ये विचारविनिमय होऊन शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास डॉ. सिन्हा यांनी व्यक्त केला. 


सध्या केवळ रेल्वे
नागपूरते मुंबई (नांदेड १६.५०) नंदीग्राम एक्सप्रेस, नांदेड येथून सायंकाळी सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस आणि १०.०५ मिनिटांनी नांदेड ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस, पहाटे सहा वाजता जनशताब्दी एक्स्प्रेस अशा चार रेल्वे मुंबईसाठी दररोज धावतात. साप्तहिक अजनी ते एसटीटी, निझामाबाद एलटीटी, काझीपेठ (ताडोबा एक्स्प्रेस) ते एलटीटी अशा रेल्वे आहेत. मुंबई ते सिकंदराबाद रात्री नंतर रेल्वे नाही. म्हणजेच १६ तास रेल्वे नसल्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत, हे रेल्वेमंत्र्यांनीच एका कार्यक्रमात मान्य केले आहे. 


मुंबई-औरंगाबादया दोन शहरांदरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या औरंगाबाद ते मुंबई या दोन बसेस आणि चार रेल्वेच धावतात. प्रवाशांची संख्या दुपटी-तिपटीने अधिक असताना बस आणि रेल्वेची संख्या तोकडी आहे. त्यामुळे खासगी वाहतूक फोफावली असून या त्रांगड्यामुळे प्रवाशांची लूट होत आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे. 

बातम्या आणखी आहेत...