आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिका दिनानिमित्त उद्या रॅली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शनिवारी सकाळी वाजता क्रांती चौक येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पैठण गेट, टिळक पथ, औरंगपुरा मार्गे रॅली मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाईल.
या ठिकाणी शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनी यांचा सहभाग राहणार आहे.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर आणि शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.जिल्हा प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड,मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी केले आहे.