आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview - हिंदूंचे सर्वाधिक कल्याण कम्युनिस्ट पक्षानेच केले - राम बाहेती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम दिव्य मराठी - 'गप्पा डावपेचांच्या' या सदरात रवविारी संघर्षशील नेते, आयटकप्रणीत बालवाडी-अंगणवाडी कामगार संघटनेचे लढवय्ये संस्थापक, आयटक युनियनचे नेते तथा भाकपचे जिल्हा सचवि प्रा. राम बाहेती यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. केवळ मनपा निवडणूकच नव्हे तर राज्यस्तरीय राजकारण, डाव्या पक्षांच्या भूमिकांवर त्यांनी आपली सडेतोड मते मांडली. 'दवि्य मराठी'च्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना भ्रष्टाचार या एकमेव मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या राजकारणावर जात, धर्म आणि पैशांचा प्रभाव आहे. ज्यांच्याकडे साम, दाम, दंड, भेद, नीती आहे, त्यांची राजकीयदृष्ट्या चलती आहे. मात्र आम्ही सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी भांडतो. लोकांचे लक्ष मात्र जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांकडे असते, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. डॉ. भालचंद्र कांगो यांच्या तालमीत वाढलेले कार्यकर्तेसुद्धा मनपात प्रस्थापति पक्षांची उमेदवारी घेऊन निवडून आलेले आहेत. लोकांमध्ये असलेल्या देवभोळेपणा, धर्मभोळेपणाचा गैरफायदा घेऊन शिवसेना-भाजपसारखा पक्ष त्यांच्या मतांची लुबाडणूक करत आहे.

फक्त शिवसेनेने हिंंदूंच्या कल्याणाचा ठेका घेतला नाही. हिंदूंच्या रक्षणाच्या बाता तर त्यांनी अजिबात मारू नयेत. सर्वाधिक हिंदूंचे कल्याण जर कोणी केले असेल तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केल्याचा दावा प्रा. राम बाहेती यांनी केला आहे. रोजगार हमीच्या कामावर जाणारा समाज हिंदूच आहे.
आयटकच्या अंगणवाडी कर्मचारी-कामगार महिला मुस्लिम, ख्रिश्चन नव्हे तर हिंदूच आहेत. भाकपने श्रमिक, कष्टकरी, ऊसतोड कामगार, मोलकरणींचे प्रश्न उचलले. या वर्गातील पीडति काय हिंदू नाहीत काय..? असा संतप्त सवाल प्रा. राम बाहेती यांनी उपस्थति करत शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याची टर उडवली. मते लाटण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करायचा, त्यानंतर त्यांचे प्रश्न कुणी सोडवायचे? वर्षाचे बाराही महनिे भाकप त्यांच्यासाठी धावून जात असते. त्यामुळे यंदा निवडणुकीत धर्मभोळेपणा, देवभोळेपणा सोडून फक्त विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे, असे आवाहनही प्रा. बाहेती यांनी केले, त्यांच्याशी झालेला संवाद असा...

श्रीकांत सराफ : भाकपसह डाव्या पक्षांची स्थिती समाधानकारक आहे, असे तुम्हाला वाटते का..?
नाही,खरंच सांगायचं झालं तर विधानसभा-लोकसेचे निकाल पाहता आमची स्थिती समाधानकारक नाही. राजकीयदृष्ट्या आम्ही भक्कम आहोत, पण संसदीय राजकारणात फार यश मिळालेले नाही. पूर्वी मात्र आमचे नगरसेवक, जि.प. सदस्य होते. आताही ग्रामपंचायत सदस्य आहेत, काही ठिकाणी सरपंचही आहेत. आम्ही संघर्षाच्या राजकारणात आहोत. देशातील ९३% लोक असंघटित असून ७% लोकांचे मजबूत संघटन आहे. आम्ही ९३ % असंघटित कामगार, श्रमिक, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करत आहोत. त्यांचे प्रश्न धसास लावण्याचे काम करत आहोत. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात नसलो तरीही रस्त्यावरील सत्ता आमच्याच हाती आहे.
शेखर मगर : भाकप मनपाच्या किती जागा लढतेय, शहर बचाव मोर्चाच्या घटक पक्षांचे अस्तित्व काय आहे...?
भाकप,माकप, लाल निशाण पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारिप-बहुजन महासंघ आदींसह साधारणत: पंचवीस पक्षांची आघाडी आहे. आम्ही ४५ जागा लढत आहोत. त्यामध्ये भाकपचे नऊ उमेदवार आहेत.
मंदार जोशी : किती उमेदवार निवडून येतील असे तुम्हाला वाटते..?
आम्ही बऱ्यापैकी मजल मारणार आहोत. ४५ पैकी १५ जागांवर लक्ष केंद्रति केलेले आहे. त्यापैकी अॅड. अभय टाकसाळ, भास्कर लहाने आणि मनीषा भोळे आदी उमेदवार निवडून येण्यासारखे आहेत. काही अपक्षांनी आम्हाला पाठिंबा मागतिलेला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही विचार करत आहोत.

माजेद खान : पाठिंबा कोणत्या पक्षाला द्याल, किंवा तुम्हाला गरज पडल्यास कोणत्या पक्षांचा पाठिंबा घेणार आहात..?
आधी सांगतिल्याप्रमाणे आम्ही ४५ जागा लढवत आहोत. काही अपक्षांनी पाठिंबा मागतिला असून पाठिंबा दिल्यास अन् सत्ता मिळाल्यास आम्ही अपक्षांचा पाठिंबा घेऊ. अन्यथा शिवसेना-भाजप किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी यांना कदापिही पाठिंबा देणार नाही. दोन्ही पक्ष भाऊ-भाऊ आहेत.
अजय कुलकर्णी : शहर बचाव मोर्चाचीच सत्ता आल्यास कोणत्या पाच मुद्द्यांना प्राधान्य देणार आहात..?
सर्वप्रथमआम्ही पाणी वतिरणाचे खासगीकरण बंद करणार आहोत. समांतरऐवजी आम्ही मनपामार्फत पाणीपुरवठा करणार आहोत. त्यासाठी जायकवाडी जलाशयातील पाणी 'लिफ्ट' करण्याची क्षमता वाढवावी लागणार आहे. शहरातील पारंपरिक नैसर्गिक स्रोतांमार्फत पाणी मिळवण्यावर भर दिला जाईल. नहर-ए- अंबरी, हर्सूल तलावातून पाणी मिळवले जाईल. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर मनपाचा महसूल वाढवण्यात येईल, रस्त्यांचा विकास करू, उद्यानांचा विकास होईल, पर्यावरणाचा समतोल राखण्यात येईल.
मंदार जोशी : निवडणुकीतील गैरमार्ग अवलंबता येत नसल्याचे कारण पुढे करत आपण अपयशी झाल्याचे म्हणता, मग दिल्लीत 'आप'ला कसे जमते?
काँग्रेसआणि भाजपचे साटेलोटे आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष अालटून पालटून सत्ता उपभोगत असतात. भाजपला कंटाळले की काँग्रेसला निवडून देतात. मात्र या वेळी दोन्ही पक्षांना कंटाळल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी तिसऱ्याच राजकीय गटाचा जन्म घातला. त्याचे नाव 'आप' असे आहे. प्रस्थापति पक्षांची उत्पत्ती असून त्यांनी निवडून आल्यानंतर काय रिझल्ट दिले हे आपल्याला माहितीच असेल. 'आप' देखील भांडवलदारी पक्षाचा एक घटक आहे.
महेश रामदासी : 'आप' निवडणूक लढवत नसले तरी काही कार्यकर्त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे का..?
महनिाभरापूर्वीभाकप कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी 'आप'चे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या श्रेष्ठींनी निवडणूक लढण्यास मनाई केल्यानंतर मात्र त्यांनी आमच्याकडे येणे बंद केले आहे. वैयक्तिक पातळीवर त्यांनी आम्हाला मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
प्रवीण ब्रह्मपूरकर : डॉ. भालचंद्र कांगो यांच्या पराभवानंतर आपल्या पक्षांनी काही आत्मचिंतन केले की नाही..?
आमच्यापक्षातर्फे चिंतन शिबिरांचे आयोजन केले जाते. आम्ही खूप चिंतन केले आहे. मला जाणीव आहे की, त्यांना चौदाशेपेक्षा अधिक मते घेता आली नाहीत. नगरसेवक निवडणुकीतही त्यांना सव्वाशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला, पण परिस्थिती सारखी बदलत असते. त्यामुळे आत्मचिंतन करून आम्ही पुढे सरकत आहोत.
सतीश वैराळकर : वैश्विक स्तरावरच डाव्या पक्षांची वाताहत सुरू झाल्याचे आपण मान्य करता का..?
केरळ,पश्चिम बंगाल, त्रिपुरा येथे डाव्या पक्षांनी राजकीय क्रांती केली होती. आता मात्र देशात अनेक ठिकाणी आमचा पाडाव झाल्याचे मी मान्य करतो. परंतु वैश्विक स्तरावरील कम्युनिस्ट राष्ट्रांनी क्रांती केलेली आहे. लॅटनि अमेरिकेमध्ये क्युबा, बोलेव्हिया आदी राष्ट्रांनी अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी शक्तीची गुलामगिरी झुगारून लावलेली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, राम बाहेती यांचे इतर विचार...