औरंगाबाद - प्रख्यात उद्योजक, सीएमआयएचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.
चार मे रोजी दुपारी दोन वाजता एमजीएमच्या रक्मिणी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती राहणार असल्याचे सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी कळवले आहे.