आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Kadam And Chandrakant Khaire In Kranti Chowk Program

तिळगूळ क्रांती; खैरेंनी दिला कदमांना तिळगूळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या वर्षभरापासून सातत्याने एकमेकांवर तोफा डागणाऱ्या पालकमंत्री रामदास कदम खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात तात्पुरता का होईना समेट झाला आहे. क्रांती चौकात जाहीर कार्यक्रमात क्रांती चौकात खासदार खैरेंनी पालकमंत्री कदम यांना जाहीर तिळगूळ देत तिळगूळ क्रांती केली. त्याला प्रतिसाद देत कदम यांनीही गोडगोड बोला भांडू नका असे सांगत सर्वांनाच शुभेच्छा दिल्या.
कडक, रोखठोक थेट बोलणारे रामदास कदम या वेळी संक्रातीमुळे असेल कदाचित पण अतिशय मधुर वाणीने वावरताना दिसले. कालही तोच अनुभव आला आणि आज तर जाहीर कार्यक्रमात ते पुन्हा ठसठशीतपणे समोर आले. मागच्या आठवड्यापर्यंत एकमेकांवर टीका करणारे खासदार खैरे कदम शिवसेनेच्या तिळगूळ वाटपाच्या कार्यक्रमात एकत्र होते. तिथे आपल्या भाषणात खैरे यांनी भाईंच्या कामाचे कौतुक करताना आपण त्यांना घरचा तिळगूळ देणार असल्याचे सांगितले. सोबत आणलेला डबा उघडून तो भाईंच्या समोर केला गोड गोड बोला असे आवाहन केले. भाईंनीही त्याला तसाच प्रतिसाद दिला. नंतर आपल्या भाषणातही त्यांनी खैरेंसह सर्वांना उद्देशून तिळगूळ घ्या, गोड बोला भांडू नका असा संदेश दिला. यामुळे उपस्थितांत खैरे-कदम शीतयुद्ध संपले की काय अशी चर्चा सुरू झाली. कदम आणि खैरे अशा दोन गटांत विभागली गेलेली औरंगाबादची शिवसेना संक्रांतीच्या मुहूर्तावर झालेल्या या तिळगूळ क्रांतीने पुन्हा एकत्र काम करू शकते का या चर्चेला ऊत आला आहे.
खैरे यांनी हाताची ओंजळ करत पालकमंत्री कदम यांच्यासमोर तिळगूळ केला. या वेळी आमदार संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे.