आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंवर झाले सीतेचे, श्रीराम कथा सोहळ्यात राम-सीता स्वयंवराचा देखावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या सिडको, अाविष्कार कॉलनी, एन-६ येथील बंधू चौकात सुरू असलेल्या श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात राम-सीता स्वयंवराचा देखावा सादर करण्यात आला. चिमुकल्यांचा सहभाग आणि ‘स्वयंवर झाले सीतेचे...’ या गीताच्या तालावर हा प्रसंग सादर होताना संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. 

अाविष्कार कॉलनी येथे सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्यात हनुमंत पाटील महाराज (सोलापूरकर) यांच्या मधुर वाणीतील रामकथा ऐकण्याची संधी परिसरातील नागरिकांना मिळत आहे. कथेतील ‘सीता स्वयंवर’ हा महत्त्वाचा प्रसंग सादरीकरणाने या सोहळ्याला रंगत आली. राम-सीता, लक्ष्मण हनुमानाच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी या देखाव्यात सहभाग नोंदविला. एक तारखेपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात रामकथेसोबतच भजन-कीर्तनाचेही आयोजन होत आहे. शनिवार, जानेवारी राेजी या गायत्री परिवारातर्फे सामूहिक गायत्री मंत्र पठणानंतर दीपोत्सव साजरा झाला. त्यानंतर रविवार, रोजी सोहळ्याची महाप्रसादाने सांगता होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...