आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैरंगाबादच्या प्रतिष्ठित रामा, अजंता अॅम्बेसेडर अन् लेमन ट्री हॉटेल्सच्या बारला लागणार कुलूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटर अंतराच्या आत असणारे सर्व बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग कामाला लागल्याचे वृत्त गुरुवारी डीबी स्टारने प्रसिद्ध केले. यात काही अपवाद वगळता औरंगाबाद शहरातील सर्व प्रमुख फाइव्ह स्टार हॉटेल्सच्या बारना कुलूप लागणार आहे. त्यात रामा इंटरनॅशनल, अंजता अॅम्बेसेडर, लेमन ट्री, अमरप्रीत आदी हॉटेल्सचा समावेश आहे. त्याशिवाय इतर असंख्य हॉटेल्स तसेच बारही या नियमाच्या घेऱ्यात आहेत. दुसरीकडे एक लॉबी हे महामार्ग पालिकेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसे झाल्यास पालिका रस्ते बनवण्याच्या स्थितीत आहे का, हा प्रश्न उपस्थित होईल. 
 
शहरामधीलया प्रमुख रस्त्यावरील दुकानांना फटका 
बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा हा ११ किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातो. महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा किमी अंतराचा मार्ग आहे. तोही राष्ट्रीय महामार्ग आहे. याशिवाय नागपूर हायवे, जळगाव हायवे, अहमदनगर हायवे, कन्नड-सोलापूर या रस्त्यांचादेखील यात समावेश आहे. या रस्त्यांवरील सर्व प्रमुख हॉटेल्समधील बार आणि दुकाने या नियमामुळे बाधित होतात. 
 
नियमानुसारच कारवाई
छोटे हॉटेलअसो की फाइव्ह स्टार. ते जर नियमानुसार ५०० मीटरच्या अंतरात असतील तर त्यावर कारवाई ही होणारच. त्यांना परवाने दिले जाणार नाहीत.
-सी.बी.राजपूत, अधीक्षक,उत्पादन शुल्क विभाग, औरंगाबाद 
 
रिटपिटिशन दाखल करणार 
महाराष्ट्रातील सर्वजिल्ह्यांतील बार असोसिएशन एकत्र येऊन या निर्णयासंदर्भात एकत्रित री पिटिशन दाखल करणार आहोत. असोसिएशननेे मुबंई येथील आहार या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या असोसिएशनची भेट घेऊन निर्णय घेतला आहे. न्यायालयाने निर्णयात काही बदल करावा अशी मागणी केली जाणार आहे. शिवाय इतर काही राज्यांशीही आमचा संपर्क सुरू आहे.
शिवाजीपाटील, अध्यक्ष,औरंगाबाद बार असोसिएशन 
 
मधला मार्ग काढण्यासाठी लॉबी सक्रीय
शहरातून जाणारे राज्य राष्ट्रीय महामार्ग मनपाकडे वर्ग व्हावेत यासाठी एक लॉबी प्रयत्न करत आहे. फक्त हॉटेल्स वाचवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच हे रस्ते महामार्गांतून वगळण्यासाठी या लॉबीने तयारी सुरूही केली आहे. त्यातून मोठमोठ्या हॉटेल्सबरोबरच मार्गांवरील दारू दुकानेही वाचवण्याचा प्रयत्न आहे. या लॉबीत राजकीय लोक आणि संबंधित व्यावसायिक सक्रिय आहेत. आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून शहराचा विकास आणि शहरवासीयांच्या दृष्टीनेही हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तिजोरी रिकामी असलेली पालिका रस्त्यांचा विकास करू शकणार नाही. 
 
पुढील स्लाईडवर वाचा काय म्हणाले, रामा इंटरनॅशनलचे मॅनेजर... अजंताच्या मॅनेजरने मांडली ही भूमिका.... ताज ताज हॉटेल, लेमनट्री आणि अमरप्रीत हॉटेल्सचे प्रशासन काय म्हणाले....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...