आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी २७ कोटी गेले, आता ३४ कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केवळ तपासणी शुल्काचे परत येणार असलेले ३० लाख रुपये भरू शकल्याने २७ कोटींच्या निधीवर पाणी सोडणाऱ्या मनपाच्या हातून दोन वर्षांपासून येऊन पडलेला रमाई आवास योजनेचा ३४ कोटी रुपयांचा निधी हातचा जाण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, स्वच्छ महाराष्ट्र योजनेत पाणंदमुक्त शहर करण्यासाठी कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मनपाला मिळाला आहे.
आज मनपात गलिच्छ वस्ती सुधारणा समितीची बैठक झाली. त्यात या विषयावर चर्चा झाली.
बैठकीनंतर महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासोबत सभापती सुभाष शेजवळ यांनी चर्चा केली अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. महापौर म्हणाले, दारिद्य्र रेषेखालील नागरिकांना घरकुल देण्यासाठी रमाई आवास योजना आहे. त्यात शासनाकडून ३४ कोटी रुपये मनपाला मिळाले. योजनेच्या सुरुवातीला सर्वेक्षण करून लाभार्थी ठरवण्यात आले, साडेचार हजारांच्या या यादीतील फक्त ११५० जणांना या योजनेचा लाभ मिळाला. आता समाजकल्याण खात्याने मनपाला पत्र पाठवून आहेत ते ३४ कोटी तीन महिन्यांत वापरले नाहीत तर निधी परत घेतला जाईल, असे कळवल्यानंतर हालचाली सुरू झाल्या.

११ हजार ९९७ कुटुंबांना जावे लागते ‘उघड्यावर’
केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शहरी भाग पाणंदमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी सरकारने निधी वितरित केला आहे. मनपाला कोटी ६७ लाख रुपये निधी दिला आहे. त्यातून शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना त्यांच्याकडून अर्ज मागवून ही सुविधा दिली जाणार आहे. यासाठी मनपाला सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शौचालय नसल्याने उघड्यावर जाणाऱ्या कुटुंबांची संख्या ११ हजार ९९७ एवढी आहे.