आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायण, भगवदगीता, बायबल उर्दूत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमखास मैदानावर सुरू असलेल्या उर्दू पुस्तक मेळाव्यात रामायण, भगवदगीता आणि बायबल उर्दू भाषेत विक्रीसाठी आल्यामुळे उर्दू भाषिक वाचकांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील विक्रेत्यांनी वाचकांसाठी हे ग्रंथ उपलब्ध करून दिले असून या ग्रंथांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.

उत्तर प्रदेशच्या रामपूर रजा लायब्ररीच्या स्टॉलवर फारसी भाषेतील रामायणाच्या तिन्ही खंडांचे उर्दूत भाषांतर केले आहे. संपूर्ण रामायण वेगवेगळ्या फोटोंसह उपलब्ध असून ते वाचकांना आकर्षित करत आहे. रामायणची किंमत ५ हजार रुपये आहे. त्याचे भाषांतर प्रा. शाह अब्दुस्सलाम व डॉ. वकारुल हसन सिद्दिकी यांनी केले आहे.
भगवदगीतेची किंमत १०० रुपये असून डॉ. साजिद सिद्दिकी यांनी त्याचे भाषांतर केले आहे. बायबलचे भाषांतर डॉ. झाकीर नाईक यांनी केले आहे. मोहंमद पैगंबर (स.) यांचे संपूर्ण जीवन चरित्र, हजरत इमाम हुसैन यांची शहादतचे हिंदी, उर्दू भाषांतर केलेले पुस्तक तसेस फिरोजशहा तुलघक यांच्या १२६६ ते १२८७ या काळातील तारीख-ए-फिरोजशाही हस्तखिलखित पुस्तक उपलब्ध आहे.

पाकिस्तान, सौदी अरेबिया येथील लेखकांच्या कादंबऱ्या, शेरोशायरी, इतिहासाची पुस्तके, इस्लामिक पुस्तके यासह हिटलरची महेबुबा, थोडासा आसमा, वापसी, कोई लम्हा गुलाब हो या कादंबऱ्या तर सौदी अरेबिया येथील लेखकाचे सन्नन अबुदाऊद हे चार हजार दोनशे रुपये किमतीचे इस्लामिक पुस्तक विक्रीसाठी आले आहे.
आजम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांची भेट
पुणे येथील प्रसिद्ध आजम कॅम्पसच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी पुस्तक मेळाव्याला भेट दिली. पुस्तक खरेदी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्याथी याठिकाणी भेट देऊन पुस्तकांची खरेदी करीत आहेत.