आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीए सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले - रामदास आठवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. या सरकारने मोठय़ा प्रमाणात काळे धन जमवले असल्याचा आरोप रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. सध्या शिवसेना-भाजपसोबत असलो तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी पाईक असल्याचे ते म्हणाले.
रांजणगाव शेणपुंजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बुधवारी महायुतीतर्फे सभा घेण्यात आली. या वेळी आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, रिपाइं सध्या युतीसोबत असल्यामुळे विरोधक बिनबुडाच्या अफवा पसरवत आहे. महायुतीमुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक अर्थिक घोटाळ्यांचा खुरपूस समाचार घेतला. व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाट, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, माजी महापौर भागवत कराड, अँड. गौतम भालेराव, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, प्रशांत शेगावकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, ब्रrानंद चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. जे. के. आमराव यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी सुखदेव सोनवणे, प्रवीण नितनवरे, काकासाहेब गायकवाड यांच्यासह शिवसेना, भाजप, रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.