आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार रामदास आठवले यांचे रेल्वे मंत्र्यांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी- कुर्डुवाडी येथील रेल्वे वर्कशॉपला एम.एल.आर.बी.जी. कोचेसचा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी ५०० कोटी रुपये निधीची तरतूद नीती आयोगामध्ये करावी आणि चिंकहील (ता.माढा) येथील आर.पी.एफ झोनल ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे शिफ्ट करता चिंकहील येथेच सुरू करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन महेंद्र जगताप यांनी दिल्लीच्या भेटीत केंद्रीय राज्य सामाजिक न्यायमंत्री खासदार रामदास आठवले यांच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले. 

कुर्डुवाडी येथील रेल्वे वर्कशॉप एम.एल.आर.बी. जी. कोचेस प्रॉजेक्ट देण्यात यावा, कुर्डुवाडी वर्कशॉपमध्ये वॅगन रिहॉबली स्टेशन काम रेल्वे बोर्डाकडून मंजूर करण्यात आले होते. ते काम कोलकात्याच्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ते ९६ वॅगनचे काम रद्द करून वर्कशाॅपच्या कामगाराकडून करून घेण्यात यावे आर.बी. आर.आर.सीच्या माध्यमातून वर्कशॉपमध्ये कामगार भरती करण्यात यावी, अशी निवेदनात मागणी आहे. चिंकहील (ता.माढा) येथील आर.पी.एफ ट्रेनिंग सेंटर विकसित करण्यासाठी कोटी ९१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. कॅटिंगसाठी २७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले होते. फायरिंग रेंजसाठी ९५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे प्रशस्त ५० फुट उंच फायरिंग रेंज उभारली आहे. 

या मागण्यांचाही समावेश 
कुर्डुवाडीयेथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये एम.डी. डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, नव्याने सोयीनीयुक्त नवीन इमारत उभा करण्यात यावी, रेल्वे शाळेतील मराठी माध्यमाचे पहिली ते चौथीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. इमारत बांधण्यासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ती इमारत त्वरित बांधून शाळेमध्ये सी.बी.ई सी. पॅटर्न सुरू करावा, मुंबई ते पंढरपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस दररोज करावी, गार्ड आणि ड्रॉयव्हरच्या लॉबीमध्ये ए.सी. बसवावा तसेच शौचालय बांधण्यात यावे. दिल्लीकडे जाण्यासाठी कुर्डुवाडी मार्गे एकच गाडी असून, आणखी एक रात्रीच्या वेळस नवीन गाडी सुरू करावी. रेल्वे वर्कशॉपमध्ये बेसिक ट्रेनिंग सेंटर चालू करून एक सुपरवायझरची नेमणूक करावी. 
बातम्या आणखी आहेत...