आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणविरोधकांनी आधी जाती नष्ट कराव्यात, नंतर आरक्षण संपवण्याची भाषा करावी: अाठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आरक्षण आर्थिक निकषांवर असावे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि म. गो. वैद्य यांनी आधी मांडले होते. नंतर अधिकृत भूमिका जाहीर करत संघानेदेखील आरक्षणाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले होते. भाजप सरकार आरक्षणविरोधी नाही. पण आरक्षण जातीय विषमतेमुळे आल्यामुळे आरक्षणविरोधकांनी आधी जाती नष्ट कराव्यात आणि नंतर आरक्षण संपवण्याची भाषा करावी, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

चौका येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी सोमवारी,२३ मे रोजी आठवले शहरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ‘आरक्षण संपवण्याऐवजी आता उलट आरक्षणाची मर्यादा वाढवणे गरजेचे आहे. उत्तरेत गुज्जर आणि तत्सम जातींना वाढीव आरक्षण हवे आहे. महाराष्ट्रात मराठा समाजालाही आरक्षणाची गरज आहे. मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक कोटा आरक्षित ठेवण्यास भारतीय संविधानाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे संविधानात बदल करण्याची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या मागास पण उच्च जातींना २५ टक्के आरक्षण देण्याला आपली काहीच हरकत नाही. पण मराठा आणि तत्सम उच्च जातींना आरक्षण देण्यापूर्वी सहा लाखांची क्रिमिलेयरची अट घालावी असेही ते म्हणाले. 

भाजप सरकारच्या काळात देशात जातीय हत्याकांडे वाढल्याची टीका केली जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळातही खैरलांजी, खेर्डा, सोनई हत्याकांड झाले. याचा अर्थ असा नाही की, काँग्रेसने त्या वेळी हे घडवून आणले. दलित हत्याकांडांना मानसिकता जबाबदार असते, राजकीय पक्षांचे धोरण नाही, असे आठवले म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...