आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेतही 33 टक्के आरक्षण देऊ : रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर ठिकाणी महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले, मात्र संसदेत अद्यापही महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झालेले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर पहिले विधेयक महिला आरक्षणाचे मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही खासदार रामदास आठवले यांनी येथे दिली. टीव्ही सेंटर येथे आयोजित रिपाइंच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी नगरसेवक सुरेश इंगळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला.

खासदार आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायम समता आणि एकतेसाठी आयुष्य वेचले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्याउलट शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वातील महायुती सामाजिक परिवर्तनासाठी काम करत आहे. आमचा उद्देश केवळ राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा नाही. या माध्यमातून सवर्ण आणि दलितांमधील दरी दूर करणे हा आहे.

..तर मुस्लिमांनाही आरक्षण द्या
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. मात्र, त्यांना आरक्षण दिले तर देशातील मुस्लिमांनाही आरक्षण दिले गेले पाहिजे. एनडीएला मुस्लिमांचे मतदान हवेच आहे. त्यामुळे त्यांनीही रिपाइंच्या पाठीशी उभे राहून महायुती आणि एनडीएच्या उमेदवारांना मतदान करावे, अशी भूमिकाही त्यांनी विशद केली. व्यासपीठावर प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, माजी आमदार अनिल गोंडाणे, अँड. ब्रrानंद चव्हाण, प्रा. सुनील मगरे, किशोर थोरात, संजय ठोकळ आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक र्शावण गायकवाड यांनी, तर सूत्रसंचालन मिलिंद शेळके यांनी केले. पुंजाराम जाधव यांनी आभार मानले.

पक्ष प्रवेश आणि टाळ्यांचा गजर
आठवले यांनी पँथर्स रिपब्लिकन पक्षातून रिपाइं (ए) मध्ये येणार्‍या कार्यकर्त्यांची नावे जाहीर करताना प्रत्येक नावाला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. नगरसेवक सुरेश इंगळे यांचे सर्मथक रामदास बोराडे, र्शावण गायकवाड, विजय मगरे, प्रकाश दाभाडे, साहेबराव जाधव, शैलेंद्र मिसाळ, आरिफ हुसेनी आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश जाहीर करण्यात आला.

सहा खासदारांच्या पवारांनाही सोबत घेऊ
राष्ट्रवादी काँग्रेसने 22 जागा लढवण्याचे ठरवले असले तरी त्यांच्या फक्त सहा किंवा सात जागा निवडून येतील, असे भाकीत आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, पवार यांना निवडणुकीनंतर गरज पडल्यास आम्ही सोबत घेणार आहोत. त्यासाठी एनडीएच्या नेत्यांचे आपण मन वळवू. अण्णा हजारे हे आंदोलनकर्ते असून त्यांनी फक्त आंदोलनेच करावीत. आम आदमी पार्टी किंवा इतर कुठल्याही पक्षाला पाठिंबा देण्याच्या भानगडीत पडू नये. पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, माजी आमदार अनिल गोंडाणे, प्रदेश उपाध्यक्ष दौलत खरात, किशोर थोरात, नागराज गायकवाड आदींची उपस्थिती होती.