आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपाइंला सहा मंत्रिपदे हवीत! महायुतीकडे रामदास आठवले यांची मागणी; राखी ठरली आकर्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येणार्‍या विधानसभेत रिपाइंला सत्तेमध्ये 15 टक्के वाटा म्हणजे किमान पाच ते सहा मंत्रिपदे हवीत, असे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. लोकसभेत आमचे उमेदवार पडले. कोणत्याही निवडणुकीत आमचे उमेदवार पडतात. पडण्याची आम्हाला सवयच झाली आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला पडायचे नाही, तर काँग्रेसला गाडायचे आहे, असेही ते म्हणाले.
शनिवारी संत तुकाराम नाट्यगृहात कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा झाला. प्रख्यात सिनेअभिनेत्री, आयटम गर्ल आणि रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष राखी सावंत, प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. आठवले म्हणाले की, महायुतीसोबत मी एकटाच गेलो असे लोक म्हणायचे. मात्र मी एकटा नाही तर ही जमलेली गर्दीदेखील माझ्यासोबत आली आहे. मेळाव्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या रक्षणाचे अभिवचन दिल्यामुळेच महायुतीला दलितांची मते मिळाली. आता भाजपच्या खासदारांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची भूमिका मांडणे गैर आहे. बाबूराव कदम यांनी रिपाइंला महायुतीत सन्मानपूर्व वाटा मिळायला हवा, तर महासचिव अविनाश महातेकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आठवले यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी ब्रम्‍हानंद चव्हाण, मिलिंद शेळके, एस. डी. मगरे, किशोर थोरात, सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, श्रावण गायकवाड, नागराज गायकवाड, पप्पू कागदे, दौलत खरात, गौतम सोनवणे, कांतीकुमार जैन, कुसुम चव्हाण, सांडू श्रीखंडे, नगरसेवक सुरेश इंगळे आदींची उपस्थिती होती. संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले.

राखींमुळे कार्यकर्ते व्यासपीठावर
राखींसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे व्यासपीठावर गोंधळ उडाला. तब्बल अर्धा तास फोटोसेशन सुरू होते. कार्यकर्त्यांना खाली खेचताना पोलिसांची तारांबळ उडाली.

फक्त हार घालून चालणार नाही
प्रदेश उपाध्यक्ष गौतम भालेराव यांनी कार्यकर्त्यांच्या वागणुकीवर टीका केली. ते म्हणाले की, कार्यकर्त्यानी फक्त नेत्यांना हार घालून चालणार नाही. कार्यकर्त्यांनी मतदान वाढवण्यासाठी आगामी विधानसभा निवडनुकीत मतदानही वाढवले पाहिजे.
पुढील स्‍लाइडवर वाचा काय म्‍हणाली राखी