आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athawale News In Marathi, RPI, Chandrakant Khaire, Shiv Sena, Divya Marathi

‘जागरूक आहेत औरंगाबादचे मतदार सारे.. म्हणून तर निवडून येतात चंद्रकांत खैरे - आठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘जागरूक आहेत औरंगाबादचे मतदार सारे.. म्हणून तर निवडून येतात चंद्रकांत खैरे..कार्यकर्त्यांनो द्या तुम्ही गावागावांत जयभीम आणि जय महाराष्ट्राचे नारे कारण फिरू लागले आहेत खैरेंच्या भोवती विजयाचे वारे’.. अशा इन्स्टंट शायरीने महायुतीचे नेते खासदार रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ आठवले यांची गुरुवारी टीव्ही सेंटर येथील राजीव गांधी मैदानावर सभा झाली. मोदींच्या विरोधकांवर सडकून टीका करताना आठवले म्हणाले, ‘विरोधक करत आहेत नरेंद्र मोदींचा प्रचार खोटा.. म्हणून मी काढणार आहे त्यांचा जबरदस्त काटा..आठवले यांच्यासोबत कोणी जाणार नसल्याची टीका आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, मी बांधला आहे डोक्यावर भगवा फेटा.. काँग्रेसचा पडला आहे ओस ओटा’..
भ्रष्टाचाराची चीड : आठवले म्हणाले, लोकांमध्ये भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. लोक संतापलेले आहेत. काँग्रेसचे सरकार लोकांनाच नको आहे. देशात नरेंद्र मोदी यांचे वारे वाहत आहे. या लाटेत खैरे यांचा विजय सहज होईल. या वेळी आमदार प्रदीप जैस्वाल, रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मिलिंद शेळके यांनी केले. आभार किशोर थोरात यांनी मानले. या प्रसंगी दौलत खरात, प्रा. सुनील मगरे, नगरसेवक सुरेश इंगळे, मुकुंद घोरपडे उपस्थित होते.