आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ramdas Athwale News In Marathi, RPI, Maharashtra Assembly Election, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर पुन्हा आघाडीचे सरकार, आठवलेंचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जागांच्या वादात येऊ घातलेली सत्ता गमावू नका, अहंकार बाजूला ठेवा. इतिहास घडवण्याची संधी समोर असताना युती तुटली तर राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येईल, असा इशारा देत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपला जागावाटपाचा वाद सबुरीने मिटवण्याचा सल्ला दिला.

आठवले शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. दुपारी त्यांनी "दिव्य मराठी'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी संपादकीय सहका-यांशी गप्पा मारताना त्यांनी युतीबाबत भाष्य केले. आठवले म्हणाले की, देशात काँग्रेसविरोधात जनतेचा मूड आहे. जनतेने केंद्रात एनडीएचे सरकारआणले. राज्यात एनडीएचेच सरकार आले तर केंद्राच्या माध्यमातून राज्याचा विकास करता येणे शक्य आहे. त्यामुळे आता जागावाटपाच्या वादात दोन्ही पक्षांनी सत्ता गमावायला नको. अहंकार बाजूला ठेवून युती झाली नाही तर राज्यात सत्ता येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आज शिवसेना आणि भाजप या दोघांनाही वाटते की, आपण वेगळे लढलो तरी सत्ता येऊ शकते; पण त्यांचा भ्रमनिरास होईल, असा इशारा त्यांनी दिला. थोड्या जागा वाढवा, ही भाजपची मागणीही चुकीची नसल्याचे सांगत आठवले म्हणाले की, भाजपला सात-आठ जागा वाढवून द्या, असे आपण शिवसेनेलाही सांगितले आहे. जागावाटपावरून युती तुटू नये यासाठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपण प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.

मुंडे असते तर ही वेळ आली नसती आठवले म्हणाले की, गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ अाली नसती. त्यांनी शिवसेनेचीही समजूत काढली असती आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांचीही समजूत काढली असती. परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेऊन सल्ला देणारा व समजूत काढणारा नेता दोन्ही पक्षांत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.