आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही पाणीपट्टी वसुली होतेच कशी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर योजनेतून पाणी मिळाल्यावरच पाणीपट्टीची वसुली करावी, असे करारात स्पष्ट नमूद आहे. त्याचे पालन करण्याचे आदेश तुम्ही (म्हणजे पालकमंत्री रामदास कदम) यांनीच दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. तुमचे अादेश असूनही ठेकेदार पाणीपट्टी कशी वसूल करतो, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कदम यांना केला. त्यावर कोंडीत सापडलेल्या कदमांनी पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्याशी दोन मिनिटे चर्चा केली आणि माझ्या आदेशाची लवकरच अंमलबजावणी होईल, असे उत्तर दिले.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने कदम हे रविवारी सकाळी शहरात दाखल झाले होते. जिल्हास्तरीय ६० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी सोमवारी (२२ जून) सकाळी त्यांनी युतीची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांची नावे हवी आहेत, असा निरोप देण्यात आला. त्यानुसार भाजपचे माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, संजय केणेकर यांना सकाळी साडेनऊ वाजता सुभेदारी विश्रामगृहावर बोलावण्यात आले होते. कोणत्या समितीवर आपले किती सदस्य पाठवता येतील, याचा विचार करून भाजपचे पदाधिकारी सुभेदारीवर दाखल झाले. परंतु प्रत्यक्षात फक्त समांतरवरच चर्चा झाली. तुमचे म्हणणे आम्हाला सांगा, वृत्तपत्रांकडे का जाता, असा सवाल खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला अन येथूनच वादाची ठिणगी पडली. जिल्हास्तरीय विविध प्रकारच्या ६० समित्यांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करायची आहे. याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, समांतर प्रस्तावाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात...
बातम्या आणखी आहेत...