आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात वर्षभरात पाणी, जाहीर सभेत पालकमंत्री कदम यांचे आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जो रस्ता खासदार चंद्रकांत खैरे यांना करणे जमले नाही तो रस्ता मी पालकमंत्री झाल्यावर चुटकीसरशी केला. खैरे चांगले आणि आदर्श खासदार असून त्यांच्यासारखे खासदार असलेच पाहिजेत, असा खोचक टोला पालकमंत्री रामदास कदम यांनी लगावला. सातारा-देवळाई निवडणुकीत पक्षाच्या संयुक्त प्रचार सभेत बोलताना सातारा-देवळाईला एका वर्षात समांतर योजनेतून पाणी देऊ, असेही त्यांनी सांगितले.
सातारा देवळाईच्या निवडणुकीनिमित्त सेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारानिमित्त देवळाई परिसरात गुरुवारी सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, महापौर त्र्यंबक तुपे, सभापती राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती. शुक्रवारी प्रचाराचा अंतिम दिवस आहे. दोन्ही वॉर्डांतील प्रचारासाठी इतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आले नसताना कदमांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी कदम म्हणाले, सातारा-देवळाईच्या निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांनी यायची गरज नाही. परंतु मी पालकमंत्री असताना दोन्ही वॉर्ड जिंकणे शिवसेनेसाठी महत्त्वाचे असल्याने मी स्वत: सभा घेत आहे. शहराला एक चांगला पालकमंत्री मिळाला असून पालकमंत्र्यांकडे पाहूनच मतदान करावे, असे आवाहन करत खासदार चंद्रकांत खैरे इतर गटाचा उल्लेखही त्यांनी टाळला. सातारा-देवळाईच्या विकासाकडे स्वत: लक्ष घालत पथदिवे, रस्त्यांसह एका वर्षाच्या आत परिसराला समांरतचे पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नगरसेवक विकास जैन, अण्णासाहेब माने, बंडू ओक, मीना गायके, नितीन साळवे, सुमित्रा हाळनोर, राजेंद्र राठोड, उमेदवार हरिभाऊ हिवाळे, पल्लवी गायकवाड, शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.

खासदार खैरे हे तसे चांगले...
"आम्हा दोघांत उगीचच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तसे पाहता खासदार खैरे चांगले आहेत,' असे म्हणत व्यासपीठावर बसलेले अंबादास दानवे यांच्याकडे पाहत "अंबादासच आमच्यात आग लावण्याचा प्रयत्न करतो,' असा टोला त्यांनी लगावताच खसखस पिकली. यानंतर कदम म्हणाले, हरिभाऊ नावाचे माणसं चांगलीच असतात. शहरातीलच भाजपचे हरिभाऊ बागडे हेही चांगले आहेत. ते विधानसभा अध्यक्ष होऊ शकतात तर आमचे हरिभाऊसुद्धा उत्तम नगरसेवक होऊ शकतात, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
बातम्या आणखी आहेत...