आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी साधला तनवाणींवर निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचे नेते किशनचंद तनवाणी यांच्यामुळे गुलमंडीसह शहरातील इतर काही जागा गेल्याचा राग शिवसेना नेत्यांना असून पालकमंत्री रामदास कदम यांनीही थेट किशनचंद तनवाणी यांनाच यासाठी सगळ्यांसमक्ष जबाबदार धरले. यामुळे आकड्यांच्या बाबतीत शिवसेनेची भाजपसोबत युती झाली असली तरी मनोमिलन झालेले नाही हे पुन्हा दिसून आले.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपसोबत युती करायला नको होती असे विधान केले होते, त्याबाबत विचारले असता कदम यांनी गुलमंडी व महापौर पडल्या म्हणून खैरे चिडले आणि तसे बोलले असावेत. बंडखोरी जास्त झाल्याची कबुली त्यांनी दिली.

अन् खुलासा केला
कदम म्हणाले की, या तनवाणींनी सगळे केले. त्यांनी अनेक अपक्ष उभे केले. त्याचा फटका बसला. त्यावर तनवाणी यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला पण मध्येच खैरे यांनी गुलमंडीचा विषय वाढवला. त्यावर तनवाणी यांनी थेट कदम यांना सांगितले की, गुलमंडीवरून मी अर्ज मागे घ्यायलाही तयार होतो. पण यांनी सुराणानगरातून प्रफुल्ल मालाणी यांना कुठे माघार घ्यायला लावली. तनवाणी यांच्यावर रोख ठेवत कदम यांनीही बरेच सुनावले.
पुढे वाचा... तुपे कोणत्याही गटाचे
नसल्याचा झाला फायदा