आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक प्रार्थनेने रमजान ईद साजरी, मान्यवरांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रमजान ईद वाळूज परिसरातील विविध गावांमध्ये सामूहिक नमाजने गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली गुरुधानोरा, कमलापूर, येसगाव, लिंबेजळगाव, नारायणपूर, रहिमपूर, जिकठाण, दहेगाव आदी ठिकाणीही विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. या सणाच्या निमित्ताने फराळ शिरखुर्म्याचा आनंद लुटला.
वाळूजगाव : हापिसमौलाना हामिद शेख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी वाजेला सर्वजण जामा मशिदीजवळ जमा झाले. तेथून रांगेत शांततेने ईदगाह मैदानावर आले. या ठिकाणी साडेनऊच्या सुमारास धार्मिक विधी मार्गदर्शन केल्यानंतर मौलाना हामिद शेख यांनी सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यानंतर दोन हजारांवर नागरिकांची उपस्थिती होती. मान्यवरांनी एकमेकांना अालिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानालगत असलेल्या आप्तेष्टांच्या कबरीवर फुले वाहून दर्शन घेतले. पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, उपनिरीक्षक एस. व्ही. तायडे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

तुर्काबाद खराडी
सकाळीसाडे दहाच्या सुमारास हापिस सलीम पठाण यांनी सामूहिक प्रार्थना घेतली. या कार्यक्रमास ३०० नागरिकांची उपस्थिती होती. वाळूज पोलिस ठाण्याच्या वतीने संरक्षण व्यवस्था सांभाळली.

शेंदुरवादा
हापिसहशमोद्दीन साहब यांनी सकाळी पावणेदहाच्या सुमारास सामूहिक प्रार्थना घेतली. प्रार्थनेस परिसरातील सव्वातीनशेंवर नागरिकांची उपस्थिती होती. पोलिस उपनिरीक्षक एम. एस. पुरी, पोलिस जमादार नंदकुमार आव्हाळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...