आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईदच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा फुल्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी शहागंजमधील बाजारपेठ लोकांनी फुलून गेली होती. ईदच्या पूर्वसंध्येला सर्वच बाजारपेठांत तोबा गर्दी झाली होती. - Divya Marathi
शुक्रवारी शहागंजमधील बाजारपेठ लोकांनी फुलून गेली होती. ईदच्या पूर्वसंध्येला सर्वच बाजारपेठांत तोबा गर्दी झाली होती.
औरंगाबाद - रमजान ईदनिमित्त छावणीतील ईदगाह मैदानात नमाज अदा केली जाणार आहे. त्यामुळे १८ जुलैला वाहतूक मार्ग चार तासांसाठी बंद राहणार आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार ते मिलिंद चौक रस्ता वाहतुकीसाठी सकाळी ७ ते ११ बंद राहील. नमाज अदा करण्यासाठी टाऊन हॉल, मकई गेटकडून येणाऱ्यांची वाहने डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात लावली जातील. ज्युबिली पार्ककडून येणारी वाहने डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या आवारात थांबतील.
मिल कॉर्नर, बारापुल्ला गेटकडून येणारी वाहने मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या प्रांगणात लावता येतील. मिलिंद चौकमार्गे येणारी वाहने मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील वाहनतळावर थांबतील.

खरेदी जोरात
रमजान ईदनिमित्त शहरातील विविध भागांत खरेदीसाठी झुंबड होत आहे. शुक्रवारी शहागंजमधील बाजारपेठ लोकांनी फुलून गेली होती. ईदच्या पूर्वसंध्येला सर्वच बाजारपेठांत तोबा गर्दी झाली होती.
छाया : अरुण तळेकर
आज रमजान ईद; नमाजाच्या वेळा
ठिकाण वेळ...
छावणी ईदगाह ९.३०
मस्जिद गंजे शहिदा १०.००
काली मस्जिद चौक ९.००
मस्जिद दर्गा निजामोद्दीन ९.१५
मस्जिद चौक ९.१५
जामा मस्जिद उस्मानपुरा ९.३०
ईदगाह उस्मानपुरा १०.००
मस्जिद शहानूरमियां हनवी ९.००
मस्जिद मोती कारंजा १०.००
मस्जिद शुत्तारिया मोंढा ८.३०
मक्का मस्जिद ९.००
ईदगाह रोजेबाग ९.३०
मस्जिद फैजान ९.३०
मस्जिद सराय हर्सूल जेल ८.३०
मस्जिद अमाद ९.१५
मस्जिद बागशेरजंग ८.००
हरी मस्जिद ९.००
ठिकाण वेळ...
बारी मस्जिद ९.००
रौशन जामा मस्जिद ९.००
मस्जिद अ. कादर ९.१५
मस्जिद कुबा ९.३०
तैयबा मस्जिद ८.४५
सिकंदर मस्जिद ९.००
दर्गाह मस्जिद ८. ३०
सायरा मस्जिद ९.००
िमस्बाह मस्जिद ९.००
दर्गाह हजरत ९.३०
मस्जिदुलसमद ९.००
मस्जिद जन्नती ८.००
मस्जिद अबुबकर ९.१५
नवाब मस्जिद ९.००
मस्जिद अहमदी ९.३०
ईदगाह शाहसोकत्ता ९.३०
मस्जिद रेल्वेस्टेशन ९.००
बातम्या आणखी आहेत...