आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुयत-ए-हिलालची घोषणा; आज रमजान ईद साजरी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे रमजान ईद (ईद-उल-फित्र) मंगळवारी (29 जुलै) साजरी होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरात चंद्रदर्शन झाले नाही, मात्र देशभरात विविध ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याची खात्री करून ‘रुयत-ए-हिलाल’ कमिटीतर्फे ईद-उल-फित्रची अधिकृत घोषणा करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. ईद साजरी होणार असल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
छावणी, रोजाबाग, उस्मानपुरा येथील ईदगाहमध्ये ईदची नमाज पढण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा व ईदगाह कमिटीतर्फे छावणी ईदगाहची साफसफाई, रंगरंगोटी करून मंडप उभारण्यात आला आहे.

ईदगाह मैदानावर वजू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ईदच्या नमाजसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शेकडो मुस्लिम तरुण स्वयंसेवकाची भूमिका निभावत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतात. यासाठी वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या वर्षी ईदगाहच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रीटचे काम झाल्यामुळे नमाजसाठी येणाºया भाविकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे. दरवर्षी चार ते पाच लाख मुस्लिम बांधव शहरातील विविध भागांतून नमाजसाठी छावणी ईदगाहमध्ये येतात. या अनुषंगाने ही तयारी करण्यात आली आहे. शिवाय कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी रात्रीपासूनच ईदगाह मैदानात पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.
ईदनिमित्त वाहतुकीत बदल
औरंगाबाद- रमजान ईदनिमित्त छावणीतील ईदगाह येथे विशेष नमाज अदा होणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ते मिलिंद चौक रस्ता वाहतुकीसाठी मंगळवारी सकाळी 7 ते 11 पर्यंत बंद राहील. टाऊन हॉल, मकई गेट, बेगमपुºयाकडून येणारी वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात थांबतील. ज्युबली पार्क, पाणचक्कीमार्गे येणारी वाहने डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात थांबवावीत. मिल कॉर्नरकडून येणारी वाहने डॉ. आंबेडकर स्टेडियमध्ये तर छावणीकडून येणाºया वाहनाची मिलिंद विज्ञान कॉलेजच्या मैदानात थांबवावीत.

ईद-उल-फित्र नमाजाचे वेळापत्रक
ईदगाह छावणी 9.30
पाणचक्की मशीद 10.00
काली मशीद चौक 9.00
मशीद शहागंज 9.45
मशीद सिटी चौक 9.15
दर्गाह ह.निजामुद्दीन 9.15
मशीद,उस्मानपुरा 9.30
शहानूर हमवी 9.00
ईदगाह उस्मानपुरा 10.00
मशीद, बायजीपुरा 10.00
मशीद रेल्वेस्टेशन 9.30
ईदगाह रोजाबाग 9.30
मशीद मोतीकारंजा 10.00
मशीद शुत्तारिया,मोंढा 8.30
मशीद, नवाबपुरा 9.30
मशीद, दिल्लीगेट 9.00
ई.शाहसोख्तामियां 9.30
मशीद चेतनानगर 8.00
मशीद, नवाबपुरा 9.30
मशीद पैठण गेट 9.30