आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: राज्‍यभरात रमजान ईदचा उत्‍साह, औरंगाबादेत आनंदाला उधाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्‍यभरात सकाळपासून रमजान ईदचा उत्‍साह दिसत असून ठिकठिकाणी मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूरसह राज्‍यात विविध ठिकाणी रिमझिम पावसात ईदचे विशेष नमाजपठण सामुदायिकरित्‍या झाले. त्‍यानंतर एकमेकांना शुभेच्‍छा देत विविध समाजबांधवांनी हा उत्‍साहात सहभागी होऊन राष्‍ट्रीय एकात्‍मतेचा संदेश दिला.
नाशिक- रमजान पर्वचे रोजे पूर्ण करत मुस्लीम बांधवांनी गुरूवारी सकाळी ईदचे विशेष नमाजपठण केले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वात नमाजपठणाचा सोहळा यशस्वीरित्या साजरा झाला. या वर्षीच्‍या सोहळ्याचे विशेष वैशिष्‍ट पाहायला मिळाले ते म्‍हणजे. सुरूवातीला व समारोपाच्‍या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी आतंकवादाचा निषेध नोंदविला. या उत्‍सवाला वरूणराजाची साक्षही होती.

मुंबईमध्‍ये कडक बंदोबस्‍त..
ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्‍ये कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील मदिना मशिदीजवळ झालेल्या आत्मघातकी स्फोटानंतर गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला होता. आज ईदच्या दिवशी सर्व मशिदींच्या आवारात मिळून तब्बल 16 हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, रमजान ईदचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...