आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रांजणगाव शेणपुंजीत अवतरला साक्षात सावता महाराजांचा मळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- रांजणगाव शेणपुंजी येथील गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांची गर्दी होत आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यातील श्रीसंत सावता महाराज यांच्या आरण गावातील शेतमळ्याची सुंदर प्रतिकृती श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाने तयार केली आहे. हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गावातील तरुणांनी एकत्र येऊन सन १९८९ मध्ये श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. यंदा मंडळाचे २६ वे वर्ष आहे. या वेळी मंडळाने एक एकर परिसरात श्रींची स्थापना व उत्कृष्ट देखावा सादर केला आहे. हा देखावा पूर्णत: ह्यइको-फ्रेंडलीह्ण आहे. यातील गणेशमूर्तीसुद्धा शाडूच्या मातीपासून बनवण्यात आली आहे. यासाठी तीन लाख रुपये खर्च आल्याची माहिती मंडळाचे अशोक गोरे यांनी िदली.
असा आहे देखावा
संत सावता माळी मंदिर परिसरात मंडळाने गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. गावात प्रवेश करताच नजरेला सावतांचा हिरवागार फळ-भाज्यांनी फुललेला खराखुरा मळा दृष्टीस पडतो. समोरील बाजूस असणा-या जुन्या आंब्याच्या झाडाखाली सावता महाराज विठ्ठलाचे नामस्मरण करताना दिसतात. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात परब्रह्म विठ्ठल श्रीगणेशाच्या स्वरूपात प्रकट झालेले आहेत, तर मागील बाजूस शेतकरी विहिरीतून बैलजोडीच्या साहाय्याने मोट ओढून मळ्याला पाणी देत आहेत. ख-या खु-या बैलांप्रमाणे चालणा-या बैलांचा व शेतक-यांचा देखावा यंत्राच्या साहाय्याने बनवला आहे. तसेच विहिरीतून मोटेच्या साहाय्याने पडणारे पाणी पुढे मळ्यातील भाजीपाल्याला जाताना दिसते.
सदरील गणेश मंडळाचे उद्धाटन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच कांताबाई अशोक जाधव, पंचायत समिती सदस्या कविता हिवाळे, जि.प.सदस्य मनोहर गवई, अशोक जाधव, दत्तू हिवाळे, बालचंद जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या अध्यक्षा उषा हिवाळे, करण जाधव तसेच देखावा समितीचे अशोक गोरे, दीपक जाधव, दीपक सवई, सुभाष गोरे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.