आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लाखांची खंडणी मागणारे पोलिसांना शरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माहितीच्या अधिकाराचा धाक दाखवून प्राचार्य आणि अध्यक्षाकडे तीन लाखांची खंडणी मागणारे चौघे आज पोलिसांना शरण आले. या चौघांची जामिनावर सुटका करण्यात आली. चिकलठाणा एमआयडीसीत असलेल्या राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाकडे हर्षकुमार मगरे आणि त्याच्या साथीदारांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी अर्ज केला होता. माहिती द्यायची नसेल तर 6 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगत प्राचार्य आणि अध्यक्षांकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद देशपांडे यांच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक गौतम खरात यांचा मुलगा कुणाल, विजय देहाडे, स्वप्निल गणोरे आणि मगरे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे चौघेही शुक्रवारी पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मनीष पाटील यांनी दिली.