आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raosaheb Danve News In Marathi, Divya Marathi, BJP, Voters, Aurangabad

वर्षभर दिसले नाहीत, आज अचानक अवतरले;दानवेंच्या प्रचार रॅलीनंतर मतदारांच्या प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वर्षभर ना खासदार दिसले, ना त्यांच्या निधीतून वॉर्डात कोणते विकासकाम झाले. मात्र, मोदींमुळे यंदा दानवेच चालणार, असा सूर मंगळवारी दानवेंच्या प्रचार रॅलीनंतर ऐकायला मिळाला. जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी चिकलठाणा, मुकुंदवाडी या भागात प्रचार रॅली काढली. रॅलीला नागरिकांनी प्रतिसाद दिला असला तरी रॅली संपताच त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली.
मोदींचा जयघोष : रॅलीत दानवे यांनी घरोघरी प्रत्येकाला भेटण्यावर भर दिला. परिसरातील लहान-मोठे व्यापारी आणि नागरिकांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. या परिसरात जवळपास 60 हजार मतदार राहतात. त्यामुळे या भागात भाजपने विशेष लक्ष दिले आहे. मात्र, रॅलीत भाजपपेक्षा मोदींच्या नावाचा जयघोषच जास्त दिसून आला.
दलित वस्तीत प्रचाराचा जोर वाढला : गेल्या वेळी दलित वस्त्यांमध्ये भाजपला अडीच हजार मतांची पिछाडी होती. मात्र, महायुतीमुळे दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळेच बौद्धनगरमध्ये दानवेंनी भेटीगाठी घेतल्या.
निधी खर्च केलाच नाही : दानवे यांनी तीन तास चौधरी कॉलनी, बारी कॉलनी, दहिहंडे कॉलनी, म्हाडा कॉलनी, बुद्धनगर या परिसरात प्रचार रॅली काढली. रॅलीनंतर नागरिक आणि काही पदाधिकार्‍यांनी या भागात खासदारांनी निधी खर्च केलाच नसल्याच्या तक्रारी केल्या.