आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी (29 एप्रिल) मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल सदस्यांची मते जाणून घेतली. त्या वेळी 14 नगरसेवकांनी रावसाहेब गायकवाड यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला. आशा मोरे किंवा विद्यमान विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांची निवड करण्याचा आग्रह त्यांनी धरला. विरोधामुळे गायकवाड यांच्यासमोरील पेचप्रसंग आणखी वाढले आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गायकवाड यांना 4 एप्रिल रोजी विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्तिपत्र दिले आहे. गायकवाड यांनी ते पत्र स्थानिक कार्यकर्त्यांना सोपवले. परंतु, त्यांना नगरसेवकांचा पाठिंबा मिळवता आला नाही.
सदस्यांच्या नियुक्तीसाठी शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी गायकवाड यांच्याबाबत सदस्यांची मते जाणून घेतली असता नगरसेवकांनी त्यांना विरोध केल्याचे उघड झाले. याबाबत नगरसेवक म्हणाले की, डॉ. जफर खान यांच्या नियुक्तीला रावसाहेब गायकवाड, मीर हिदायत अली, प्रमोद राठोड यांनी विरोध केला होता. तेव्हा यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नव्हती. डॉ. खान यांना त्या वेळी 12 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. तेव्हाच रावसाहेब यांना ठाकरे यांनी नियुक्तिपत्र दिले होते. गायकवाड यांनी सदस्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता हे नियुक्तिपत्र आणले आहे. म्हणून या नियुक्तीला 14 नगरसेवकांनी विरोध दर्शवला असल्याची चर्चा आहे.सावंत यांनी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये 19 काँग्रेस, तर एक स्वीकृत नगरसेविकेचा समावेश आहे. यापैकी तिघांची निवड उद्या केली जाणार आहे. या वेळी पक्षातील समस्या, विरोधी पक्षनेतेपदाबद्दलची भूमिका आदीविषयी सावंत यांनी आढावा घेतला. या वेळी स्थानिक वरिष्ठ नेते व माजी खासदार उत्तमसिंह पवार, आमदार एम. एम. शेख, कल्याण काळे, आजी-माजी सदस्य उपस्थित होते. अँड. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.