आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाऊचे आमिष दाखवून पैठणमध्ये बालिकेवर अत्याचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - खाऊचे आमिष दाखवून शाळेतून घरी परतणा-या पहिलीतील सहा वर्षीय बालिकेवर शेजारी राहणा-या तरुणाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी तालुक्यातील तुळजापूर येथे घडली. या घटनेनंतर पैठणमध्ये पोलिस ठाण्यासमोर जमाव जमल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.


पैठणपासून 13 कि.मी.वरील तुळजापुरात जि.प. शाळेत पीडित मुलगी शिकते. दुपारी 3.30 वाजता शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी जात होती. तेव्हा शेख सिराज शेख शौकत (20) याने खाऊचे आमिष दाखवून तिला घरात बोलावले व कुकर्म केले. मुलीने हा प्रकार सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीला बेदम चोप दिला. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पैठण पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
अत्याचारांचे सत्र सुरूच.