आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारातील आरोपी पोलिसाला केली अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिसांच्या भीतीने तीन दिवसांपासून नायगावात दडून बसलेल्या पोलिस जमादार कदीर हमीद पटेलला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस जमादार कदीर हमीद पटेल हा पैठण पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याने सातारा परिसरातील बाळानगर येथे राहणाऱ्या एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अोढले. त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, पटेल हा दुसऱ्या लग्नाचा साखरपुडा करत असल्याची कुणकुण पीडित महिलेला लागल्यामुळे तिने पटेलची भेट घेत लग्नाचा तगादा लावला. मात्र त्याने नकार दिला. नकार दिल्यामुळे संतापलेल्या महिलेने सिटी चौक पोलिस ठाण्यात पटेलविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलिसांच्या भीतीने तो त्याचे आजोळ असलेल्या नायगावातील शेतात दडून बसला होता. याची माहिती मिळताच सिटी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्या पथकाने त्याला सायंकाळी गजाआड केले.
कदीर पटेल